आरटीओचे जानेवारी ते जून 2025 तालुकानिहाय मासिक शिबीर

धाराशिव दि.26(प्रतिनिधी):- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय,धाराशिवच्या वतीने जिल्ह्यातील मोटार वाहन चालक/मालक यांच्या सोयीसाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा सन २०२५ या वर्षातील माहे जानेवारी ते जून या कालावधीत तालुकानिहाय मासिक शिबीर आयोजित केले आहे.
या मासिक शिबीर दौऱ्यात वाहन कर वसुली,मोटार वाहन नोंदणी आणि तपासणी वाहन चालक अनुज्ञप्ती तयार करण्यात येणार आहे.
वर्ष २०२५ मध्ये उमरगा तालूक्यासाठी महिन्यातील १,२,३ व ५ व्या मंगळवारी आयोजन करण्यात आले असून येथे जानेवारी महिन्यात ७,११ आणि १८ तारखेस,फेब्रुवारी महिन्यात ४,११ आणि १८ तारखेस, मार्च महिन्यात ४,११ आणि १८ तारखेस,एप्रिल महिन्यात १,८,१५ आणि २९ तारखेस,मे महिन्यात ६,१३ आणि २० तारखेस,तर जून महिन्यात १,१० आणि १७ तारखेस शिबीर होणार आहे.
नळदुर्ग (तुळजापूर) साठी महिन्यातील दुसरा आणि चवथ्या बुधवारी आयोजन करण्यात आले असून येथे जानेवारी महिन्यातील ८ आणि २२ तारखेस,फेब्रुवारी महिन्यात १२ आणि २५ तारखेस,मार्च महिन्यात १२ आणि २६ तारखेस,एप्रिल महिन्यात ९ आणि २३ तारखेस,मे महिन्यात १४ आणि २८ तारखेस,तर जून महिन्यात ११ आणि २५ तारखेस शिबीर होणार आहे.
परंडा तालूक्यासाठी महिन्यातील २ ऱ्या आणि ४ थ्या गुरुवारी आयोजन करण्यात आले असून जानेवारी महिन्यातील ९ आणि २३ तारखेस,फेब्रुवारी महिन्यात १३ आणि २७ तारखेस,मार्च महिन्यात १३ आणि २७ तारखेस, एप्रिल महिन्यात ११ आणि २४ तारखेस,मे महिन्यात ८ व २२ तारखेस,तर जून महिन्यात १२ आणि २६ तारखेस शिबीर होणार आहे.
लोहारा तालूक्यासाठी प्रत्येक महिन्यातील ३ ऱ्या शुक्रवारी आयोजन करण्यात आले असून जानेवारी महिन्यातील २४ तारखेस, फेब्रुवारी महिन्यात २१ तारखेस,मार्च महिन्यात २१ तारखेस,एप्रिल महिन्यात २५ तारखेस,मे महिन्यात १६ तारखेस,तर जून महिन्यात २० तारखेस शिबीर होणार आहे.
भूम तालूक्यासाठी प्रत्येक महिन्यातील ३ ऱ्या गुरुवारी आयोजन करण्यात आले असून जानेवारी महिन्यातील १६ तारखेस, फेब्रुवारी महिन्यात २० तारखेस,मार्च महिन्यात २० तारखेस,एप्रिलमध्ये १७ तारखेस, मे महिन्यात १५ तारखेस,जून महिन्यात १९ तारखेस शिबीर होणार आहे.
वाशी तालूक्यासाठी प्रत्येक महिन्यातील ३ ऱ्या बुधवारी आयोजन करण्यात आले असून जानेवारी महिन्यातील १५ तारखेस, फेब्रुवारी महिन्यात १७ तारखेस,मार्च महिन्यात १९ तारखेस,एप्रिल महिन्यात १६ तारखेस, मे महिन्यात २१ तारखेस, तर जून महिन्यात १८ तारखेस शिबीर होणार आहे.
कळंब तालूक्यासाठी प्रत्येक महिन्यातील २ रा व ४ थ्या बुधवारी आयोजन करण्यात आले असून जानेवारी महिन्यातील १३ आणि २७ तारखेस,फेब्रुवारी महिन्यात १० व २४ तारखेस,मार्च महिन्यात १० आणि २४ तारखेस,एप्रिल महिन्यात २१ व २८ तारखेस,मे महिन्यात १९ व २६ तारखेस, तर जून महिन्यात ९ व २३ तारखेस शिबीर होणार आहे.
मासिक शिबीर दौऱ्याच्या दिवशी जर सुट्टी जाहिर झाली तर शिबीर दौरा दुसऱ्या दिवशी कार्यालयीन दिवशी घेण्यात येईल. अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत राहील.असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.