सहकार से समृध्दी योजना* सहकार दुग्ध सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचे आवाहन

धाराशिव.दि.२२ (प्रतिनिधी):- केंद्र सरकारच्या ‘सहकार से समृध्दी’ योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दुग्ध सहकारी संस्था स्थापन करण्याचे आवाहन विभागीय उपनिबंधक,सहकारी संस्था (दुग्ध) व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) धाराशिव यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या सहकार ते समृध्दी या महत्वाकांक्षी योजनेतंर्गत सहकार क्षेत्रात विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. देशातील सहकार क्षेत्राचे बळकटीकरण करण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दुग्ध,मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची नोंदणी करावयाची आहे.दुग्ध व मत्स्य उत्पादन करणा-या जिल्हयाच्या ग्रामीण भागतील लोकांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी एकत्र येवून सहकारी संस्थेची नोंदणी करावी, गावपातळीवरील दुध संस्था नोंदणी करताना किमान २५ वेगवेगळ्या कुटुंबातील दुध उत्पादक सभासद एकत्र येणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक सभासदांकडे सरासरी किमान ५० लिटर प्रतिदिन असावे.योजनेमध्ये सहभाग म्हणून महिलांनी एकत्र येवून दुध संस्था नोंदणी करावी.तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक दुध संस्था नोंदणी करावयाच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त पुशपालक व शेतकरी यांनी संस्था नोंदणीत सहभाग घ्यावा.
अधिक माहितीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) धाराशिव,कार्यालयाचा पत्ता- साठे चौक,तुळजापुर रोड,धाराशिव यांचेकडे संपर्क साधावा.असे आवाहन विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) छत्रपती संभाजीनगर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) धाराशिव, यांनी केले आहे.