फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने ३१ वा नामविस्तार दिन साजरा..

धाराशिव :-(प्रतिनिधी):- नामांतराच्या लढ्यातील रक्तरंजीत लढा म्हणजेच नामविस्तार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद होय. हे आंदोलन अठरा वर्षे चालले,जाळपोळ,बलात्कार, मनुष्य वध आणि धगधगत्या इतिहासाचा साक्षीदार नामविस्तार दिन होय.या लढ्यातील शुर शहिद दलित पँथर यांना फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन बुध्द वंदना घेण्यात आली.यावेळी शिलाताई चंदनशिवे,अंकुश उबाळे, बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, गुणवंत सोनवणे,बापू कुचेकर,गणेश वाघमारे, संजय गजधने प्रविण जगताप,विजय गायकवाड, बापु बनसोडे,अनुरथ नागटिळक,स्वराज जानराव, सचिन दिलपाक,अतुल लष्करे, सुनील वाघमारे,नवनाथ वाघमारे,राजाराम बनसोडे,बाबा कांबळे,सोहन बनसोडे,सरवदे,गौतम माळाळे,सह इतर उपस्थित होते.