आपल धाराशिवताज्या बातम्या
पालकमंत्री प्रताप सरनाईक* *यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

धाराशिव,दि.२४ (प्रतिनिधी):- ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण सकाळी ९ .१५ वाजता धाराशिव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदान क्र.१ येथे करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबसे यांनी केले आहे.