आपल धाराशिवताज्या बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण

धाराशिव दि २५ (प्रतिनिधी):- ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ८.१० वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत होईल.त्यानंतर जिल्हाधिकारी श्री.ओंबासे हे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करतील. जिल्हाधिकारी हे कुष्ठरोग प्रतिज्ञा व घोषणापत्राचे वाचन करून उपस्थितांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची शपथ देतील.