आई श्री तुळजाभवानी मातेची महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी सहकुटुंब केला कुलधर्म कुलाचार.

तुळजापूर (प्रतिनिधी) तुळजापूर :- १९७८ चे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी सहकुटुंब दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची ओटी व अभिषेक पुजेचा कुलधर्म कुलाचार केला. त्यांचे पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम व नाना कदम यांनी केले. महाराष्ट्र केसरी ही भारतीय शैलीतील कुस्ती स्पर्धा आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद मार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेची सुरुवात १९६१ साला पासून सुरू झालेली आहे. महाराष्ट्र केसरीचा अर्थ ‘महाराष्ट्राचा सिंह’ असा होतो.महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवारसाहेब प्रथम सन १९७८ ला राज्याचे मुख्यमंत्री झालेले त्यावेळी आप्पासाहेब कदमांनी मुंबईत पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार घेतलेला होता. यावेळी, मंदिर संस्थानकडून त्यांचा देविची प्रतिमा देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी आप्पासाहेब कदम यांनी तरूणांनी व्यसनाच्या आहारी न जाता व्यायम करून शरीर कमवून देशाचे व राज्याचे नाव लौकिक करावा असे मत व्यक्त केले