समृद्ध कोकण पर्यटनासह शहापूर शाळेची शैक्षणिक सहल सम्पन्न.

तुळजापूर (प्रतिनिधी)तुळजापूर-तालुक्यातील शहापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल समृद्ध कोकण पर्यटनासह पश्चिम महाराष्ट्रात विविध तीर्थक्षेत्र आणि निसर्ग सौंदर्य पाहत १९ ते २३ डिसेंबर दरम्यान संपन्न झाली.
शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूमीतील भौगोलिक विविधता अभ्यास शिकत असताना प्रत्यक्ष पाहता यावा याउद्देशाने विद्यालयाचे मुख्याध्यापक अमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सहलीचे आयोजित केली होती.
स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यासह मुरुड जंजिरा किल्ला,महाड येथील चवदार तळे,श्रीवर्धन बीच, शिखर शिंगणापूर,गोंदवले मठ,वाईचा गणपती, महाबळेश्वर, पाली येथील बल्लाळेश्वर गणपती, केतकावळी येथील प्रतिरूप बालाजी, जेजुरी खंडेराया, मोरगाव येथील गणपती दर्शन घेऊन पंढरपूर, सोलापूर मार्गे शहापूर येथे सुखरूप विद्यार्थी पोहोचले.
या सहलीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक अमीर शेख, विकास जोत, पठाण युनुस शेरखाॅं, स्वाती गायकवाड, प्रल्हाद काळे, कविता मानकरे, वैशाली सुरवसे,एसटीचे चालक मस्के, आकाश गोरे आदींनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.