आमदार व्हावे म्हणून तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले यांनी यांच्या घरातील महागणपतीला नवस मागितले होते.

तुळजापूर (प्रतिनिधी):- तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून यावे आणि आमदार व्हावे म्हणून तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले यांनी यांच्या घरातील महागणपतीला नवस मागितले होते.
ते नवस पूर्ण झाले. म्हणून बोधले यांच्या घरातील महागणपतीला नवस पूर्ती राणादादाच्या हातून सोवळे, चांदीच्या दुर्वा, चांदीचे मोदक गणपतीस अर्पण करून महाआरती करण्यात आली. यावेळी, आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचा बोधले परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी, तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे, मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा मोर्च्या तालुका अध्यक्ष आनंद कंदले, शहर अध्यक्ष शांताराम पेंदे, नागेश नाईक, युवा मोर्च्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिक रोचकरी, उमेश गवते, हरिदास वट्टे, गिरीश देवळालकर, बापूसाहेब अमृतराव, प्रमोद दाणे, मोर्डा तडवळा चे सरपंच न्यानेश्वर पांडागळे, विक्रम माडजे, महावीर कासार, उपस्थित होते.