आपल धाराशिवताज्या बातम्या
सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणी इच्छुक संस्थांकडून 9 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

धाराशिव,दि.२६ (प्रतिनिधी):- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर क्षेत्रातील तुळजापुर, अंतर्गत असणाऱ्या धाराशिव व सोलापुर जिल्हयातील इतर तालुक्यांमध्ये एकुण १ हजार ४०० एकर जमीनीवर योग्य मेगावॅट क्षमतेचे सोलार ऊर्जा प्रकल्प स्थापनेसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापुर यांचेमार्फत इच्छुक संस्थांकडून (EOI) अर्ज मागविण्यात येत आहे.
इच्छुक सरकारी संस्था,सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम संस्था,खाजगी कंपन्या,खाजगी संस्था,बिल्डर, विकासक,सल्लागार यांना संबंधित प्रस्ताव दाखल करण्याकरीता आवाहन करण्यात येत आहे.अर्ज ( EOI ) http://shrituljabhavanitempletrust.org.या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.इच्छुकांकडून अर्ज स्विकारण्यास ९ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****