आपल धाराशिवदेश-विदेश

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या विजयाची सभा संपन्न

धाराशिव :- (प्रतिनिधी):- तुळजापूर विधानसभेच्या उमेदवार स्नेहा ताई सोनकाटे यांच्या पाठीशी उभे रहा असे आव्हान बाळासाहेब आंबेडकर त्यांनी सकल ओबीसी समाजाला केले आहे तसेच ओबीसी आरक्षणाचा ताट वेगळं मराठा आरक्षणाचा ताट वेगळं आहे. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा फॉर्मुला आपल्याकडे असल्यास सांगितलं मी प्रस्थापित मराठ्यांपेक्षा जास्त विस्थापित मराठ्यांचा जास्त विचार करतो. म्हणून ऍड डिकले सारखे सुशिक्षित उमेदवार दिला असे ते म्हणाले ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे असे मानतो तसेच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आरक्षण वाचण्यासाठी आपले येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि संविधानावादी उमेदवार निवडून दिला पाहिजे तसेच आरक्षणाचे महत्व जाणुन सजगपने मतदान करा तसेच ओबीसी आरक्षण वाचवण्याची आणि एससी ,एसटी आरक्षणाच वर्गीकरण थांबवण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडूण देणं अत्यंत महत्त्वाचं. महाविकास आघाडी आणि महायुती यांची मिलीभगत आरक्षण संपवण्याच्या कुरघोडी चालू आहेत,असा प्रकाशआंबेडकरांचा दावा. डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या विजयाची सभा. चार उमेदवारांपैकी सर्वात जास्त लोक डॉ.स्नेहाताई सोनकाटे यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी उपस्थित होते. स्नेहाताई सोनकाटे यांनी असा दावा केला की ही सभा माझ्या विजयाची सभा आहे.23 नोव्हंबर ही फक्त औपचारिकता जाहीर करण्याची तारीख असेल. “मी बाळासाहेबांना वचन दिले की तुमची मुलगी ही सभागृहात जाऊनच दाखवेल अस त्या सभे नंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. तसेच – डॉ.स्नेहाताई म्हणाल्या की,प्रस्थापित नेते माझ्या प्रचाराला घाबरले असुन ते आता रडीचा डाव खेळ्तआहेत.प्रस्थापित नेते है माझ्या प्रचार यंत्रणेमध्ये अडथळा आणण्याचे अनेक प्रयत्न करत आहेत माझ्या अधिकारनाम्यातील एका वाक्याने ते खुप घाबरले आहेत.निवडणूक आयोगाला हाताशी धरून ते माझ्या लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.”तसेच सोनकाटे म्हणाल्या जनतेमध्ये पाटील विषयी खूप रोष आहे. त्यांनी काहीच काम न करता मतदार संघात प्रस्थापित तोरा मिरविला आहे. हा तोरा येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्कीच उतरवेल आणि राणा पाटलांना जनसामान्यांचे प्रश्न समजण्यासाठी वेळ मिळले.ओबीसी समाजाची एकजुट ही भक्कम आहे आणि ही एकजुटच माझ्या विजयाचं कारण ठरणार आहे. असा वंचितच्या बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहाताई यांचा दावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button