नळदुर्ग येथे राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पुण्यस्मरणोत्सवा निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन

जेष्ठ महिलांसह समाजा समाजातील प्रमुख व्यक्तीचा होणार भव्य सन नळदुर्ग या ऐतिहासिक नगरीत प्रथमच सर्व धर्म समभाव कार्यक्रम होतोय संपन्न
नळदुर्ग :- (प्रथिनिधी):- दादासाहेब बनसोडे
सुक्षेत्र नळदुर्ग येथे राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमेठ निर्वीकल्प समाधीस्त राजगुरू श्री ष ब्र १०८ शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पुण्यस्मरणोत्सव निमित्त नळदुर्ग शहरांमध्ये प्रथमच जगद्गुरु रेणुकाचार्य पंचधातू मूर्ती प्रतिष्ठापना व गुरुमाता अमृत महोत्सव निमित्त तुलाभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
हा कार्यक्रम दिनांक ७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आलेला आहे
नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाला हजारो वर्षाचा जाज्वल्य इतिहास आहे १२ व्या शतकात बसवकल्याणचे प्रवेशददार म्हणून या मठात अनेक शरणाने वास्तव्य केले आहे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे जागरत मठ म्हणून ओळखले जाते याच मठात सर्व धर्म समभाव म्हणत विरशैव समाजाने नळदुर्ग शहरात ७५ वर्षाच्या पुढील महिलांचा सन्मान करण्याचे योजले आहे तर सर्व जाती धर्माच्या नागरीका म्हणते प्रत्येक समाजातील ५ प्रमुख व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणे हे प्रबोधनात्मक धोरण आहे हा नळदुर्ग शहरातला सर्वात मोठा कार्यक्रम मानला जातोय या कार्यक्रमाच्या वेळी प्रवचना साठी श्री ष ब्र शांतीवीर शिवाचार्य महास्वामीजी हावगी , लिंगेश्वर मठ गडी गौडगाव , श्री शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी कट्टी मठ जळकोट श्री श्री श्री जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी नारळ मठ मुरूम , श्री पूज्य प्रभू देवराव खेडगी , श्री प पु शिव बसव देवरू मुंढेवाडी श्री प पू निरुपादी देवरू गंगरू , श्री म नी प्र विरंतेश्वर महास्वामीजी विरक्त मठ केसर जवळगा श्री म नी प्र बसवलिंग महास्वामी जी विरक्त मठ अक्कलकोट , श्री म नी प्र सदाशिव महास्वामीजी , श्री रुद्रमनेश्वर मठ चिकलपर्वी , सानिध्य श्री मातोश्री जगदेवी ताई भद्रेश्वर मठ शिरवळ , श्री म नी प्र अभिनव शिवलिंग महास्वामीजी विरक्त भट मादन हिप्परगा , सानिध्य श्री श्रीकांत शिवाचार्य महास्वामीजी हेरमेट नागणसूर ,प्र ब श्री म नि प्र नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी महेंद्रजी , श्री मनी केंद्र महास्वामीजी रक्त भट्ट ममदापूर श्री प व बालयोगी महेश्वरानंद महाराज शिंदगाव श्री पूज्य प महास्वामीजी गंगाधर स्वामी मठ तोळनूर , श्री अध्यात्मिक प्रवचन मंगल श्री ष प्र बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त अक्कण बळग आणि महिला मंडळा तर्फे तुलाभार कार्यक्रम संपन्न होणार असून त्यामध्ये दिव्य सानिध्य श्री म नी प्र राजशेखर महास्वामीजी विरक्त मठ नंदगाव , श्री म नी प्र शिवबसव राजेंद्र महास्वामीजी विरक्त मठ खेडगी , प्रवचन मंगल वाक्य श्री ष ब्र शांतिवीर शिवाचार्य महाराज महास्वामीजी पंचगृह हिरेमठ अम्मीनभावी श्री म श्रा गंगाधर महास्वामीजी विरक्त मठ धरणे जेवळी
श्री ष ब्र केदारलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ हेडगापूर दिनांक ०७ ते १८ तारखेला श्री श्री श्री वीर सोमेश्वर शिवाचार्य महाभगवत्पाद रंभापुरी महास्वामीजीधर्म संदेश सभा संपन्न होणार आहे श्री चक्र बसवराज शिवाचार्य महास्वामीजी आणि विद्वत्त पूर्ण गोजीर वाणीने आपल्या भक्तांना मठाच्या लौकिकात भर टाकली आहे नळदुर्ग येथे ५५ वर्षानंतर जगद्गुरु स्वामी वीर सोमेश्वर शिवाचार्य भगवत जगद्गुरु चे आगमन होत असून सदरील या महास्वामीच्या पदस्पर्शाने नळदुर्ग नगरी पुन्हा एकदा पवित्र होणार आहे त्यांच्या धर्मसभेत धर्मजागृती देव , देश , धर्म , अशा त्रिवेणी सन्मानाचा उद्देश होणार आहे
यावेळी आद्य पालखी महोत्सव शस्त्र कुंभ व भव्य दिव्य वाद्य वैभव समय शहरांमध्ये संपन्न होणार आहे त्यांची धर्म संदेश सभा संपन्न होणार आहे सदरील कार्यक्रमासाठी नळदुर्ग नगरी आणि परिसरातील नागरिकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मठाधिपदी श्री शब्र बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले आहे नळदुर्ग शहरात प्रथमच सर्वधर्म हा कार्यक्रम होत आसल्यामुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे