आपल धाराशिवताज्या बातम्या

जागजीच्या एन.व्ही. पी. शुगर कारखान्याचा गळीत हंगाम धूमधडाक्यात सुरू

धाराशिव :-(प्रतिनिधी):- तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही. पी. शुगर प्रा. ली. साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. संदीपान महाराज हासेगावकर यांच्या शुभहस्ते गळीत हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील आणि उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि कारखान्याच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर कारखान्याच्या आवारात ऊस गाळपासाठी पहिला ऊस आणण्यात आला आणि संदीपान महाराजांनी यंत्र चालू करून गळीत हंगामाचा शुभारंभ केला.प्रथम गणित हंगामाची तयारी पूर्ण झाली असून चालू होणार आहे.शेतकऱ्यांनी यावर्षी चांगला ऊस कारखान्याला द्यावा कारण यावर्षी गुणवत्तेवर कारखाना चालवल्या जाणार आहे व साखरेचे प्रमाण बघून द्यावा असे आवाहनही चेअरमन पाटील यांनी केले आहे
यावेळी उपस्थित शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. कारखान्याने दिलेल्या चांगल्या ऊस दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
खा. ओमराजे निंबाळकर यांनी , आपल्या भाषणात गेल्या वर्षीच्या चाचणी हंगामात कारखान्याने केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केले. त्यांनी वेळेवर ऊस उत्पादकांना पेमेंट, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि ऊस तोडणीचे पैसे दिले याबद्दल समाधान व्यक्त केले. कारखान्याने प्रतिटन २८०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असल्याचेही ते म्हणाले. शेतकरी, ऊस वाहतूकदार, कर्मचारी आणि कारखाना हे चारही घटक मजबूत असल्याने कारखाना व्यवस्थित चालतो असे प्रतिपादन खा. निंबाळकर यांनी केले. काही कारखान्यांनी गेल्या वर्षी ऊस घेतला परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पैसे दिले नाहीत याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आ. कैलास पाटील यांनी , कारखान्याने २८०० रुपये दर देऊन जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली असल्याबद्दल आभार मानले. ऊस लागवडीत वाढ झाल्याने कारखान्याने त्याची क्षमता वाढवून शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नयेत असे आवाहनही त्यांनी केले.उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांनी, कारखान्याच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आणि बँकेकडून कारखान्याला पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले. शेतकरी उसाकडे नगदी पीक म्हणून पाहतो आणि कारखान्याच्या चेअरमननी चांगली युक्ती आणि हातोटी साधली आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील, संचालक आबासाहेब पाटील, धनंजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य मागितले.
या गळीत हंगामात कारखाना चांगल्या प्रकारे चालेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी
रंगनाथराव सावंत गुरुजी ( ऊस उत्पादक शेतकरी ),नितीन मामा गरड ( ऊस उत्पादक शेतकरी ),सदाशिव पाटील, प्रकाश पाटील ,नानासाहेब पाटील (चेअरमन),आप्पासाहेब पाटील , पापा समुद्रे, उध्दव समुद्रे,समर शेख, भारत काका देशमुख संग्राम देशमुख, परवेज काझी ,जायबाय बापू, हनुमंत फेरे, के जी देशमुख ,तुळशीदास जमाले, नितीन भोसले, बाळासाहेब बोंदर ,रणधीर पाटील, कृष्णा सावंत, नाना लोमटे, भीमराव सावंत, सरपंच व्यंकट बंडगर पत्रकार दीपक सावंत रवी कोरे इत्यादी व शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button