आपल धाराशिवताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा ?

धाराशिव:- (प्रतिनिधी):- भुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-सुरेखा तानाजी काळे, रा. झगडे गल्ली ता. भुम जि. धाराशिव या दि.07.11.2024 रोजी 11.00 वा. सु. आपल्या राहात्या घराचे अंगणात अंदाजे 4,100 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

बेंबळी पोलीस ठाणे:आरोपी नामे-प्रधुम्न दत्तु पवार, वय 28 वर्षे, रा. बरमगाव खु., ता.जि. धाराशिव हे दि.07.11.2024 रोजी 13.20 वा. सु. हॉटेल शिवाशाही पत्री शेडचे पाठीमागे मोकळ्या जागेत अंदाजे 8,000 ₹ किंमतीची 80लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-शाम दत्तु सोनटक्के, वय 29 वर्षे, रा. खंडोबा मंदीरजवळ बेंबळी ता. जि. धाराशिव हे दि.07.11.2024 रोजी 16.45 वा. सु. हॉटेल संगमजवळ बेंबळी येथे अंदाजे 840 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-विजय बापु ठोसर, वय 24 वर्षे, रा. खासापुरी नं1 ता. परंडा जि. धाराशिव हे दि.07.11.2024 रोजी 18.00 वा. सु. खासापुरी नं 1 येथे पत्र्याचे शेडलगत अंदाजे 3,200 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 32 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button