जिल्हा संस्कार भारतीची समितीची गुरुपौर्णिमा साजरी

तुळजापूर -(प्रतिनिधी) :- शहरातील धट निवास येथे धाराशिव जिल्हा संस्कार भारती तुळजापूर समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला या निमित्ताने इस्कॉन संस्थेचे अध्यात्मिक गुरु प्रभुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी संस्कार भारतीचे प्रफुल्ल कुमार शेटे, अविनाश धट, लक्ष्मीकांत सुलाखे, पद्माकर मोकाशी, सुधीर महामुनी, अजय राखेलकर, कार्यक्रमाची सुरुवात केली. एक तास प्रभुजी यांनी गुरु शिष्य परंपरेवर मार्गदर्शन केले. गुरु पौर्णिमेच्या या कार्यक्रमासाठी ४० पुरुष आणि ५५ महिला उपस्थित होत्या. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते. संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर बन्साळी, प्रांत विधाप्रमुख डॉ सतीश महामुनी शेषनाथ वाघ , सुरेश वाघमारे अक्षय बन्साळी यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत सुलाखे यांनी केले.