तुळजापूर घाटशिळ तिर्थ मंदिरच्या शिखर ला तडा ; धोक्याचे संकेत

तुळजापूर :- (प्रतिनिधी):- संजय गायकवाड तुळजापूर चे महात्म्य श्रीतुळजाभवानीच्या स्पर्शाने दिमाखात दिसत असले तरी येथील दुसरे तीर्थ क्षेत्र हे घाटशिळ तिर्थक्षेत्र ” तुकाई ” पार्वती व श्रीराम भेटीचे ठिकाण आहे.येथील मंदिर शिखर चबुतऱ्यावर झुडपे वाढल्याने शिखराला धोका होण्याचे नाकारता येत नाही.मंदिरच्या दर्शनी भाग काहीसा ढासळला आहे.
सन.२०२४ नवरात्रोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे.तुळजापूर श्रीक्षेत्र वैश्विक बनवायचे आहे. कोटीवर निधी मंजूर असल्याचे मोठ्या चर्चेचे खलबते झाले आहेत/होत आहेत.मात्र भाविक भक्तांच्य श्रध्देमधील श्री घाटशिळ तिर्थाचे महात्म्य असलेल्या मंदिरची दयनिय अवस्था झाली आहे.कधी काळी मंदिरचे दगडी काम झालेले आहे. त्यानंतर विविध देवतांच्या मुर्तीने सजवलेले शिखर मंदिर संस्थानच्या गलथान कारभारा मुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहे.महत्वाचे म्हणजे नवरात्रोत्सव उत्तरार्धात सोलापूर,बार्शी,मार्गावरुन पायी येणारे भाविक भक्त घाटशिळ पायऱ्याने प्रथम ह्या ठिकाणचा वापर करत असतात.
श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर बहुतांशी भाविक भक्त श्री घाटशिळ तिर्थचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात.त्यामुळे सदरील ठिकाणची चांगली व्यवस्था असावी लागते.
………………………………………………
कारण ह्या ठिकाणला अनन्य साधारण महत्व आहे.
पुर्वी कृतायुगात या यमुनाचलावर मार्कंडेय ऋषी राहात होते.त्यांच्या आश्रमात गाय व इतर पाळीव प्राणी असत.
एकदा गायी चरत असताना गायीच्या खुरात एक शिळा / दगडाचा खडा अडकला,त्यामुळे गायीस त्रास होऊ लागला,
हे मार्कंडेय ऋषीने पाहाताच त्यांनी ती शिळा खुरातून काढून घाटावर फेकली.
प्रभु राम चंद्राच्या वनवासाच्या काळी रावणाने सितेला कपट नितीने पळवून नेले.
सितेच्या शोधात राम अतिशय दु:खी झाले. सितेच्या शोध करीत दक्षिणेस आले. पार्वतीने तेंव्हा शंकरास विचारले की राम सध्या सितेच्या शोधात आहे.
तेंव्हा मी त्याला फसविते,
त्यावर शंकर म्हणाले तू फसवू शकणार नाही.
कारण तो एक पत्नी एक वचणी आहे. तुझी ईच्छा असेल तर प्रयत्न करुन पाहा. तेंव्हा पार्वतीने स्वत: सितारुप धारण करुन मार्कंडेय ऋषीने फेकलेल्या शिळेवर उभा राहिली.त्यावेळी प्रभु रामचंद्रानी सितेचे स्वरुप पाहाताच त्यांच्या मनात चलबिचल झाली.परंतु अंतर ज्ञानाने हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला,व रामानीं विचारले? तु.का आई येथे? देवी पार्वतीस समजून आले,कि राम फसत नाही.तेंव्हा आपलं मूळ स्वरुप प्रकट करुण सितेच्या शोधाचे रामास मार्गदर्शन केले,व आशिर्वाद देवून ती गुप्त झाली.कालपरत्वे या ठिकाणास ” तुकाई ” हे नावं होऊन आजपर्यंत चालू आहे.
……………………………………………..
असे महात्म्य असलेल्या ठिकाणची दुरावस्था झाली आहे.
त्याचबरोबर येथील पिण्याचे पाणी साठवणूक सिमेंट टाकीवर पत्रे असून अस्वच्छता आहे.रस्ता अयोग्य बनला आहे.इतरही व्यवस्था करणे आवश्यक आहे.
सदरील विषयाकडे श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान किती महत्व देणार ? हे पाहाणे औस्तुक्याचे आहे.