आपल धाराशिवताज्या बातम्या
नळदुर्ग येथे जुगार अड्ड्यावर छापा

तुळजापुर:- (प्रतिनिधी):- नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.21.07.2024 रोजी 13.30 वा. सु. नळदुर्ग पो.ठाणे हद्दीत धान्य गोडावूनचे शेजारी मोकळ्या जागेत नळदुर्ग येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- बबन लक्ष्मण जाधव, वय 45 वर्षे,, गौतम महादेव बनसोडे, वय 24 वर्षे, रा. बौध्दनगर नळदुर्ग, उमेश रमेश जाधव वय 29 वर्षे, रा. रायखेल ता. तुळजापूर जि. धाराशिव हे तिघे 13.30 वा. सु. धान्य गोडावूनचे शेजारी मोकळ्या जागेत नळदुर्ग येथे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,500 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले नळदुर्ग पो.ठा.च्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.