आपल धाराशिवताज्या बातम्या
सामाजिक वनीकरण तुळजापूर कार्यालयाच्या वतीने वृक्ष दिंडी जनजागृती

तुळजापूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद कन्या प्रशाला तुळजापूर शाळेच्या 310 विद्यार्थींनी समवेत तुळजापूर शहरांमधून वृक्षदिंडी मध्ये एक पेड मा के नाम – झाडे लावा झाडे जगवा आदी घोषणा देत वृक्ष दिंडी काढण्यात आली. सदरील हरित चळवळ जनजागृती दिंडीचे विभागीय वनअधिकारी करे, वन क्षेत्र पाल पचरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वन परिमंडळ अधिकारी सामाजिक वनीकरण तुळजापूर एस बी. देशमुख, एस. एम.पांचाळ एस. एल. भोजने वक्ष मित्र मुलानी सर, नगरसेवक राहुल भैया खपले, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जगताप, मुख्याध्यापक गाडे सर व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण विभाग तुळजापूर यांनी हंगरगा रोपवाटिका मध्कये निम,रंज, पेरू, सिताफळ इत्यादी प्रकारची 5 लक्ष रोपांचे संगोपन केले असून नागरिकांस सवलतीच्या दरात घेण्यात येत आहेत.