श्री तुळजभवानी देवीचे दर्शन पास ऑनलाईन काढता येणार

तुळजापूर:- (प्रतिनिधी):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन स्पेशल पास मोबाईलवर काढता येणार आहे.तसेच यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थाने एक ऍँप तयार केले असुन. तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाथिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला
आहे, यामुळे घरबसल्या दर्शन पास 500 रुपये देणगी
देऊन काढता येणार आहे.तसेच दर्शन पास हे मंदीर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीत ऑफलाईन पद्धतीने थेट जाऊन काढता येणार आहे. त्याचं बरोबर आता ही सुविधा ऑनलाईन देखील उपलब्ध
असणार आहे. 22 जुलै सोमवार पासुन ऑनलाईन सुविधा
मोबाईल ऍपवर सुरु होणार आहे. Shri Tujabhavani
temple trust है ऍप मंदीर संस्थानच्या www.shrituljabhwanitempletrust.org या वेबसाईट
व https.//play.Google.com/Store/tuljapur या प्लेस्टोर लिंकवर उपलब्ध असणार आहे.तसेच याबाबतचे पत्र मंदीर
तहसीलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ वाडकर-माळी यांनी
काढले आहे.