जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अणदुर गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले

तुळजापूर :- (प्रतिनिधी):- तालुक्यातील, अणदूर येथे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती दि, 23 रोजी वार गुरुवार विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सकाळी ९ वाजता सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी येथे माता रमाई महिला मंडळातर्फे तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचेपूजन व अत्यंत उत्कृष्ट असे धम्मगाथांचे पठण करण्यात आले व खिरदान करण्यात आले. याप्रसंगी सलोखा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे रमाई महिला मंडळास फ्लोअर मॅट भेट देण्यात आली.
तसेच मिलिंद नगर येथे बुद्ध दर्शन तरुण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये सलोखा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, बहुजन उत्कर्ष बचत गट अणदुर, तसेच अणदूर येथील प्रसिद्ध कपड्याचे दुकान सौंदर्या फॅशन वेअर यांच्यातर्फे पाचवी ते दहावीच्या सुमारे 25 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य -गणवेश, वह्या आणि कंपासपेटी चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अणदूर गावचे सरपंच माननीय रामचंद्र दादा आलूरे व तसेच एडवोकेट दीपक दादा आलूरे, लिंबाजी सुरवसे सर, अणदूर ग्रामपंचायत सदस्य गणेश सूर्यवंशी, बबन कंदले गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुद्धभूषण सूर्यवंशी यांनी केले.
याप्रसंगी सलोखा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष- एडवोकेट शांतीबल भीमराव कांबळे, उपाध्यक्ष- प्रवीण मनोहर मुकरे, सचिव- नागनाथ हरिदास सूर्यवंशी, शशिकांत बनसोडे, कृष्णा कांबळे, इंजिनीयर अमोल वाघमारे, सुंदर वाघमारे, गंगाधर बागडे व बहुजन उत्कर्ष बचत गटाचे पदाधिकारी मनोहर सोपान बनसोडे, इंजिनीयर नागनाथ भुजंग पांडागळे, शामराव विठ्ठलराव कांबळे, कुमार गायकवाड, डॉक्टर दयानंद कांबळे, आदर्श शिक्षिका मीनाताई कांबळे, तसेच सौंदर्या फॅशन वेअरचे मालक गौतम सोपान बनसोडे यांचे योगदान लाभले.
याप्रसंगी सालेगाव व कडदेवलिंबाळा येथील गायन पार्टीचे अत्यंत श्रवणीय भीम व बुद्धगीत गायन सादर करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्धदर्शन तरुण मंडळाचे अध्यक्ष तुषार कांबळे उपाध्यक्ष मल्लिनाथ जाधव, दयानंद कांबळे रणजीत कांबळे, राम नागविले, मारुती बागडे, महेश बागडे, कमलाकर मुकरे, राजू कांबळे, तसेच सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम कांबळे, रोहित गायकवाड व इतरांनी परिश्रम घेतले.