आपल धाराशिवताज्या बातम्या

तुळजापूर तालुक्यात पवनचक्कीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर बळजबरी अन्याय

तुळजापूर :- (प्रतिनिधी) :- ज्ञानेश्वर गवळी :- तुळजापूर तालुक्यात पवनचक्कीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर बळजबरी अन्याय आहे.रिन्यू पवनचक्की कंपनी स्थानिक गाव गुंडांना तसेच तालुक्यातील नावाजलेल्या गुंडांना हाताशी धरून प्रचंड प्रमाणात जमीन खरेदीचे बेकायदेशीर कामे करीत आहेत.तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे तसेच तुळजापूर पोलीस ठाण्यातील पवनचक्कीच्या समर्पित आहेत राजकीय पुढाऱ्यांचा वरदस्त तसेच स्थानिक गावगुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यावर अनेक ठिकाणी अन्याय होत आहे परंतु तालुक्यातील सर्व गावे यांच्या राजकारणाला बळी पडत आहेत त्यातच चिकुंद्रा हेगाव अपवाद आहे चिकुंद्रा तुळजापूर पोलीस ठाणे व नळदृग पोलीस ठाणे यांचा पवन चक्की च्या लोकांचीलढा देण्याचा राजमार्ग सापडला असा ऐकण्यात आहे चिकुंद्रा गावातील सुजाण नागरिक नागरिकांनी रेणू कंपनीला जबरदस्त धडा शिकवला आहे कोणतेही राजकारण किंवा पुढार्‍याचे पाठबळ न घेता स्थानिक शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नळदुर्ग भागातील प्रसिद्ध नेते यांचा मार्गदर्शनाखाली बऱ्याच शेतकऱ्याचा फायदा झाल्याचे ऐकण्यात आहे सदरील उपजिल्हाप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी शेतकऱ्याची फसवणूक कशी टाळायची ते सांगितले आहे.

चौकट…..

गावात कोणतीही पवनचक्की येऊ जमीन भाड्याने किंवा विकत देताना 20 लाख रुपये एकरी खरेदी व भाड्याने म्हटल्यास बारा लाख ,29 वर्षाच्या कराराप्रमाणे देण्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी.
पवनचक्कीला लागणारा रस्ता भाड्याने देताना गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना बोलावून घेऊन एका गुंठ्यात चार लाख रुपये गुंठा व खरेदी असल्यास दहा लाख रुपये गुंठा या प्रमाणे शेतकऱ्यांनी करार करावेत व तसेच शेतात पडणारे पवनचक्कीचे डीपी चे प्रत्येकी पोल 50 हजार रुपये व प्रत्येकी डीपी अडीच लाख रुपये व तसेच पवनचक्कीचे हायटेन्शन टावर प्रत्येकी 20 लाख रुपये याप्रमाणे घ्यावेत डीपी पोल टावर शेतातून गेल्यास भविष्यात कधीच या जमिनीचे अकृषी (एन ए )होऊ शकत नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी व तसेच टावर किंवा पोलच्या ताराखाली घर गोटा कडव्याची बनेम याची शेतकऱ्यांनी दखल घ्यावी.

सदरील रेणू पवनचक्की कंपनी हे अत्यंत बदमाश असून गावा गावात पवनचक्कीच्या जमिनीसाठी टावर साठी डीपी साठी पोल साठी साम दंड भेद वापरून म्हणजेच गावागावात दलाल निर्माण करून भाड्याने लावून दारू पाजून प्रसंगी तालुक्यातील प्रसिद्ध गुंड लावून गोरगरीबशेतकऱ्यांना मारहाण करून पवनचक्की कंपनी आपले काम साधून घेत आहे व गावागावात दलाल निर्माण करून पैशाचे आम्हीच दाखवून राजकीय वजन वापरून आपले काम साधून घेत आहे या विषयी शेतकऱ्यांनी जागृत राहणे गरजेचे आहे व यास प्रशासनाचा छुपा परंतु अर्थपूर्ण पाठिंबा आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी व शेतकऱ्यांनी एवढेच ध्यानात ठेवावे किंवा आपण जमीन विकून भूमीहीन होऊन पोर बाळांना देशदोडीला लावायचे का असे शेतकऱ्यांनो करू नका या चार पाच वर्षात झालेल्या घडामोडी समोर आले आहेत.ही वस्तुस्थिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button