ताज्या बातम्यापुणे

पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणात पोलिसांवर मोठी कारवाई

पुणे:- (प्रतिनिधी):- पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणात पोलिसांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येरवड्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अपघाताबाबतची माहिती वरिष्ठ आधिकारी आणि कंट्रोल रूमला न दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर राज्यातील राजकारण देखील तापलं आहे. राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर या अपघातानंतर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणात आता निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा अपघात झाल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठांना आणि कंट्रोल रूमला न कळवल्याने मोठी कारवाई केली आहे.

येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे.पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावं आहेत, तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते.
काय आहे संपुर्ण प्रकरण?

हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शेने चिरडले, त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला.

न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या अल्पवयीन सुधारगृहात आहे.
अल्पवयीन व्यक्तीवर प्रौढ म्हणून कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, अल्पवयीन आरोपींवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवावा. यासाठी पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. आरोपी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केल्याच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांचे हे वक्तव्य आले आहे.

ते म्हणाले की, आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 304, 304A आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button