चर्चा रिकाम्या खुर्च्यांची! खरी कुजबूज…

पालघर:- (प्रतिनिधी):- सुशांत संखे पालघर | लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीने सातपाटीमध्ये सभेचे आयोजन केले होते. मात्र अमिष दाखवून अनेक मंडळींना बोलाल्याची चर्चा या सभेत रंगली आहे.पाचशे रुपयांचे भत्ता देऊन अनेकांना या सभेत पाचारण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी सातपाटी येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पाचशे रुपये पर माणसी देऊनही खुर्च्या रिकाम्याच राहिल्याने मंत्री महोदयांना आणून काय साध्य झाले अशी चर्चा सातपाटी गावात रंगली होती.
पालघर जिल्ह्याच्या कोळी महासंघाने सातपाटी येथे कोळी बांधवांसाठी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या बरोबर संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या सभेसाठी सुधीर मुनगंटीवार सातपाटी येथे आले होते. त्यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील, राणी द्वीवेदी, संतोष जनाठे, राजन मेहेर, सरपंच सीमा भोईर सुनील सिंग आदी उपस्थित होते.
मच्छीमार समाजाच्या बरोबर संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी आयकुन घेण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेचे कोळी महासंघाने आयोजन केले होते. कार्यक्रमाला साधारण दोन अडीच हजार लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आयोजकांना होती. मात्र ३५००० लोकसंख्येच्या सातपाटी गावात त्या सभेला साधारण ४०० च्या आसपास मच्छीमार उपस्थित राहिले होते. गर्दी जमवण्यासाठी काहींना सभेला प्रत्येकी पाचशे रुपये देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र पैसे देण्यात न आल्याने एकाने थेट मंचावरच घुसखोरी केल्यावर पोलिसांनी त्याला मंचावरून खाली उतरले त्यांनी एकूण १५ माणसांना सभेसाठी आणले होते. आज सांगितल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत म्हणून त्याने मंचावर गेल्याचे उपस्थित पत्रकारांना सांगितले.