ताज्या बातम्यापालघर

राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश; भविष्यात आमदारकी …?तिकीट नाकारल्याने संतापलेल्या शिवसेना खासदाराने सोडला पक्ष…

प्रतिक मयेकर पालघर| एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पालघर, महाराष्ट्रातील खासदार राजेंद्र गावित यांनी सहा वर्षांत तिसऱ्यांदा बाजू बदलली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पालघरमधून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहे.

या वर्षी गणपती मध्ये एक मराठी गाणे प्रसिद्ध झाले होते,माझ्या पप्पानी गणपती आणला …! तसेच त्याच चालीवरील एक गाणे आज पालघर जिल्हयात ऐकण्यात आले,गावितांनी पक्ष बदलला …! गावितांनी पक्ष बदलला ..! काँग्रेस-भाजपा-शिवसेना आता पुन्हा भाजपा ..? खासदारकी गेली,आता आमदारकी साठी भाजपा..? कुठ कुठ जाणार आता..? कुठ कुठ जाणार आता..? अश्या प्रकारचे गाणे समाज माध्यमावर सकाळ पर्यंत फिरत होते.ते आता पुन्हा बघायला गेल्यावर मिळेनासे झाले.याचा अर्थ राजकीय दबाव आणून ते गाणे हटविण्यात आले आहे.पण शिवसेनेत (पूर्वीच्या)तडजोड करून लोकसभेचे तिकीट मिळविणाऱ्या विद्यामान खासदार गावितांना आता शिंदे आणि भाजपा यांच्या तहात ठरवून लोलीपोप देऊन तिकीट तुम्हालाच वाट पहा …? अश्या आशेवर ठेऊन उमेदवारी अर्ज भरायच्या काही तास अगोदर वारसा हक्काने माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या मुलाला उमेदवारी घोषित करून,भाजपाने आपला खरा चेहरा सर्वन समोर आणला..? भाजपच्या काही वरिष्ठ पदाधिकार्यांनी गावितांना उपरे दुसऱ्या जिल्ह्यातील म्हणून हिणवले होते..? पण त्याच गावितांना आपल्या पक्षात घेताना राज्याच्या पदाधिकार्यान समोर हाजी हाजी करताना दिसत आहेत.गावितांचे नंदूरबारचे तिकीट काढणारे आता कुठे आहेत…? असा प्रश्न पालघरची जनता विचारत आहेत.

कैचीत सापडलेले निकोले…

महाविकास आघाडीचा धर्म पाळावा कि मित्र म्हणून राजेश पाटीलाना मदत करायची या द्विधा मनस्थितीत डहाणूचे आमदार विनोद निकोले सापडले आहेत…? एकी कडे आदिवासी संघटना आणि जमाती यांनी भारती कामडी यांना विरोध केला असताना,आणि आता या सर्व संघटनाच्या बैठकी साठी स्वतः उद्धव ठाकरे पुन्हा पालघर दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती येत असताना,विनोद निकोले यांना मित्र राजेश पाटील कि स्वतः पाठींबा देऊन महाविकास आघाडीत उभा केलेला अकार्यक्षम उमेदवार ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपल्या कामाची कोणतीच चुणूक दाखवली नाही…?कोणाला आपली डहाणू मतदार संघातील मते देणार या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.आदिवासी ४८ संघटना आणि ४५ जमाती यांचा जिल्ह्यातील उमेदवाराला पाठींबा असताना,आणि उबाठा गटाच्या भारती कामडी यांना विरोध असताना,गावितांचा पत्ता कट झाला असे असताना.महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा हे माजी मंत्री पुत्र हिच ओळख असताना,त्यांची सामाजिक कार्याची कुठलीच माहिती भाजपा देत नसताना ४०० पैकी पालघर पण एक हे ब्रीद वाक्य कसे काय देऊ शकते…?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button