आपल धाराशिवताज्या बातम्या

संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा यात्रा महोत्सव आणि सोनारी येथील काळभैरवनाथ यात्रा 6 मे 2024 रोजी मद्यविकी दुकाने बंद

धाराशिव दि.03 (प्रतिनिधी):- जिल्हयात मौजे तेर येथे 03 ते 12 मे 2024 या कालावधीत संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा यात्रा महोत्सव साजरा होणार आहे.

6 मे 2024 रोजी श्री.संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी कार्यक्रम असल्याने या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये व सार्वजनिक शांतता अबाधित रहावी यादृष्टीने श्री. गोरोबा काका मंदिर परिसरातील व तेर गावातील सर्व देशी / विदेशी दारु दुकाने व बिअरबार परमिट रुम, बिअर शॉपी 6 मे 2024 रोजी मद्य विक्री अनुज्ञप्त्या विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

मौजे सोनारी ता.परंडा येथील काळभैरवनाथ यात्रेनिमित्त 6 मे 2024 रोजी रथ मिरवणूक व इतर धार्मिक कार्यक्रम असल्याने या दिवशी काही अनुचित प्रकार घडु नये व शांतता राहावी,यादृष्टीने मौजे सोनारी ता.परंडा येथे काळभैरवनाथ मंदिर परिसरातील व सोनारी गावातील सर्व देशी / विदेशी दारु दुकाने व बिअरबार,परमीट रुम,बिअर शॉपी 6 मे 2024 रोजी विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणा-या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द्र कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button