कामगार दिनी बांधकाम कामगारांचा शोषण…

डोक्यावर पाटी वाहून नेणाऱ्या बांधकाम कामगारांचा मलिदा लाटणारे ठेकेदार मौजेत…
(प्रतिनिधी):- सुशांत संखे
बोईसर | एक मे राष्ट्रीय कामगार दिवस म्हणून ओळखला जात असून त्याच दिवशी कामगारांचे शोषण केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
कामगार दिवस म्हणून एक मे रोजी कामगारांना शासनाकडून खास सुट्टी जाहीर केली जाते आणि त्यांना त्या आस्थापना, उद्योग तसेच ठेकेदारांकडून त्या दिवसाचा वेतन देखील दिला जातो. परंतु औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून पावसाळ्यापूर्वी हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी बांधकाम ठेकेदार या बांधकाम कामगारांना सुट्टीच्या दिवशी देखील कामाला जुंपतात भर उन्हात डोक्यावर पाटी वाहून नेणाऱ्या या बांधकाम कामगारांना मात्र एक दिवसाचाच वेतन दिला जातो.
दरम्यान या असंघटित बांधकाम कामारांची कुठेही नोंद नसल्यामुळे कामगार दिन शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील तुटपुंज्या रोजंदारीवर या कामगारांना काम करावे लागते तर कामगार विभागाकडे नोंद केल्यानंतर हे कामगार आपल्या गळ्यात अडकतील की काय या भीतीने बांधकाम ठेकेदार कामगारांची नोंदणी कामगार विभागाकडे नोंदवत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.