मंदिरात दर्शन घेताना दुजाभाव…

पालघर:- (प्रतिनिधी):- संतोष घरत :- |भारतातील सर्व मंदिरात दर्शनाकरता दुजा भाव होतो याचा अनुभव सामान्य भक्तांनी घेतलेला आहे.|
डहाणू| तालुक्यातील विवळवेढे येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेची यात्रा गेल्या २३ एप्रिल पासून सुरु आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा असून सलग १५ ते २० दिवसांपर्यंत ही यात्रा सुरू असते. या यात्रेत मोठे मोठे व्यवसायिक आपली दुकाने थाटत असतात. यामध्ये घरगुती वापराची सर्व साधने, कांदा बटाटे व्यापारी, चिकन, मटण, सुके मासे यांची दुकाने, खेळणी दुकाने, करमणूकी करिता मोठे पाळणे, मौत का कुवा हे साहसी खेळ, सर्कस, खाद्य पदार्थ आदी सह असंख्य लहान मोठी दुकाने असतात. अशातच आता इथे चोरट्यांचाही सुळसुळाट झाला आहे. असे असतानाच मातेचे दर्शन व यात्रेची मजा घेण्यास येणारे मोठ्या प्रमाणात भक्तांगण असतात., मात्र मंदिर कमीटीवरील जे सदस्य नेमलेले असतात ते दर्शन घेणाऱ्या भक्तांमध्ये दुजा भाव करत आहेत. अशी भक्तामध्ये चर्चा होताना दिसत आहे.
मंदिरामध्ये एखादा नेता ,पुढारी, व्हीआयपी, व्यक्ती मंदिरामध्ये देवाचे दर्शन घ्यावयास आल्यानंतर त्याला कमीटी मार्फत त्यांना थेट गाभाऱ्यामध्ये नेऊन दर्शन दिले जाते, तसेच देवी देवतांची त्यांच्यासोबत छायाचित्र काढली जातात , मात्र त्या उलट सामान्य भक्त ज्यावेळेस दर्शन घेण्याकरिता मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला तासनतास लाईन मध्ये उभे राहून गाभाऱ्याच्या बाहेर एक मिनिट सुद्धा उभे राहून दर्शन घेता येत नाही . मंदिर कमीटी करिता फक्त नेते, पुढारी, व्हीआयपी ,व्यक्तीच मातेचे भक्त आहेत का ? हिच सुविधा सामान्य व्यक्तीला का मिळत नाही .
मंदिरा करिता नेमलेली कमीटी हीच दर्शनाकरिता व मंदिरात प्रवेश करण्याकरिता भक्तामध्ये दुजाभाव करत आहेत. अशी चर्चा सामान्य भक्तांकडून ऐकाव्यास मिळत आहे.