गौतमी पाटील च्या तालावर नाचणार बोईसर महोत्सव…

|सबसे कातील गौतमी पाटील असं जिच्याबाबत म्हटलं जातं ती नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. गौतमीच्या कार्यक्रमाची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये आहे. नृत्यांगना गौतमी पाटील ही वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांमध्ये नेहमीच गोंधळ होतो|प्रतिक मयेकर
बोईसर| सबसे कातील असं म्हंटल्यावर आपसूकच गौतमी पाटील असं नाव ज्याच्या तोंडून बाहेर पडणार नाही असा माणूस सध्या शोधून सापडणार नाही.गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे एकच नाव सर्वांच्या ओठी ऐकून येत आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’, असं म्हणत लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची सोशल मीडियावर हवा झाली आहे. अगदी मोठमोठ्या शहरांपासून ते लहानसहान खेडोपाड्यांपर्यंत तिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. टिक टॉक स्टार आणि लावणी क्वीन म्हणून गौतमी पाटील ओळखली जाते.
येत्या ४ व ५ मे रोजी बोईसरमध्ये बोईसर महोत्सवाचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या बोईसर महोत्सवामध्ये महोत्सवाला साजेल एवढी गर्दी नसली तरी, गौतमी पाटील येणार असल्याने त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या डान्सला बघण्याकरिता नकीच प्रचंड गर्दी जमेल ह्या मध्ये तीळमात्र शंका नाही. तिच्या येण्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता असून त्याचा प्रवास करणाऱ्यां प्रवाशांना ही त्रास होईल. कार्यक्रमाच्या जवळच मोठमोठे रुग्णालय असून उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णांना ध्वनी प्रदूषण,अशा अनेक संकटांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल. एक प्रकारे रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा घाट सुरू आहे.
मागच्या वर्षभरात गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ होतो. ती कायमच चर्चेत असते. गौतमीला अनुसरण करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल, करण्यात आलं होतं. गौतमीच्या लावणीवरून निर्माण झालेला वाद आजही सुरू आहे.गौतमी पाटील ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर टीका करण्यात आली.
|”आपण दूरध्वनीवरून संपर्क केल्या नंतर मला कळले की बोईसर महोत्सवांमध्ये गौतमी पाटील येणार आहे, तशी अजून आमच्याकडून कोणतेही परवानगी घेतलेली नाही किंवा पत्रही आम्हाला आलेले नाही.”
बाळासाहेब पाटील-पोलीस अधिक्षक पालघर|
|फलक (बॅनर) विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप- अभियंता हेमंत भोईर ह्यांच्याशी संपर्क केला असता,आमच्या अख्यारीतीत येत नाही.व प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
हेमंत भोईर – उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग|