परंडा विधानसभा गृहभेट टपाली मतदान : पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

धाराशिव दि.१७ (माध्यम कक्ष) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ मध्ये वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने या मतदारांना गृह मतदानाची सोय केली आहे.या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर ५ दिवसात नमुना १२ ड भरून गृह मतदानासाठी नोंद करावी लागते.
परंडा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ६९५ आणि १२७ दिव्यांग अशा एकूण ८२२ मतदारांनी नोंदणी केली आहे. या मतदारसंघात १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान गृह भेट टपाली मतदान घेण्यात सुरुवात झाली आहे.
गृहभेट टपाली मतदानाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी ८५ वर्षांमधील ३६६ आणि ७१ दिव्यांग अशा एकूण ४३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित दोन दिवशी मतदान पथके संबंधित ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर ५ दिवसात नमुना १२ ड भरून गृह मतदानासाठी नोंद करावी लागते. जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ६९५ आणि १२७ दिव्यांग असे एकूण ८२२ ज्येष्ठ व दिव्यांग मतदार १८ नोव्हेंबरपर्यंत मतदानाचा हक्क बजावणार आहे.
*******