नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी कार्यक्रम समन्वयकांना निर्देश* जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

धाराशिव,दि.११ (प्रतिनिधी):- सार्वजनिक आरोग्य विभागअंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व कार्यक्रम समन्वयकांनी झोकून देऊन काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी दिले.
जिल्ह्यात सुरु असलेल्या आरोग्यविषयक विविध कार्यक्रमाचा आढावा आज ११ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृह आयोजित बैठकीत घेण्यात आला.यावेळी डॉ.घोष बोलत होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.एल.हरदास व जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आढावा बैठकीमध्ये जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी,राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियामक समिती, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,आर के एस के कार्यक्रम,पीसीपीएनडीटी सल्लागार समिती,तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,रुग्ण कल्याण समिती आपत्कालीन वैद्यकीय सेवा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, वातावरणातील बदल व मानवी आरोग्यावरील परिणाम,जिल्हा प्राणीजन्य आजार समिती,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,कुष्ठधाम वसाहत रुग्ण कल्याण समिती मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प आदी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आरोग्यविषयक विविध कार्यक्रम मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राबवून मार्च २०२५ पर्यंत या सर्व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी दिल्या .
या बैठकीसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित बनसोडे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.मारुती कोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जीवन कुलकर्णी,जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी किशोर तांदळे तसेच जिल्हास्तरीय इतर विभागाचे अधिकारी (सदस्य),सर्व तालुका आरोग्य अधिकारी,सर्व वैद्यकीय अधीक्षक,सर्व समितीचे सदस्य तसेच सर्व कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.