राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

तुळजापूर (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण, एक रौप्य व चार कांस्य पदकांची कमाई केली आहे. तुळजापूरच्या प्रियंका हंगरगेकर, यश हुंडेकरी व समर्थ शिंदे राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
बारामती येथे 06 ते 09 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सांघिक प्रकारात 19 वर्षे वयोगट (मुले) सुवर्ण पदक, 17 वर्षे वयोगट (मुली) रौप्य पदक, 17 वर्षे वयोगट (मुले) व 14 वर्षे वयोगट (मुले) कांस्य पदक पटकावले आहे. एकेरी मध्ये 17 वर्षे वयोगट मुली-प्रियंका हंगरगेकर सुवर्ण पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. याशिवाय समर्थ शिदे (14 वर्ष वयोगट) व यश हुंडेकरू (19 वर्ष वयोगट) यांनी कांस्य पदक पटकावत देवास – मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेरीत धडक मारली आहे.
14 वर्षे वयोगट मुले समर्थ शिंदे, आयुष जगताप, 14 वर्षे वयोगट मुली ईश्वरी गंगणे, 17 वर्षे वयोगट मुले सुयश आडे, प्रथमेश अमृतराव, श्रेयश गायकवाड, 17 वर्षे वयोगट मुली प्रियंका हंगरगेकर, शुभांगी नन्नवरे, गार्गी पलंगे, 19 वर्षे वयोगट मुले यश हुंडेकरी, कृष्णा थिटे या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
यशस्वी खेळाडूंचे सॉफ्ट टेनिस असोसिएशन धाराशिवचे जिल्हाध्यक्ष संदिप गंगणे, सचिव शिराज शेख, प्रशिक्षक हेमंत कांबळे, संजय नागरे, करण खंडागळे, आदित्य सापते आदींनी अभिनंदन केले आहे.