तुळजापूर विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील बहुमताने विजयी होणार :- युवा नेते विनोद गंगणे तुळजापुर शहरात पिटू भैय्या गंगणे फॅक्टर चालणार ?

तुळजापुर :-(प्रतिनिधी):- धिरज जाधव:- तुळजापूरविधानसभा निवडणुकीत प्रचारयंत्रणा वेगाने गती घेत आहे प्रत्येक उमेदवारांचे कार्यकर्ते सोशल मीडिया व जमिनीवर आक्रमक भूमिका घेऊन प्रचार करताना दिसून येत आहे सध्याचे वातावरण पाहता राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रचारात वेग घेतल्याने विरोधी पक्षातील उमेदवारांनी हालचाली वाढवल्या आहेत तसेच युवा नेते विनोद गंगणे यांनी प्रचारात उडी घेऊन राणाजगजितसिंह पाटील पारडे जड केले आहे हे दिसून येत आहे गंगणे यांनी तुळजापूर शहरातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना लीड देऊन बहुमताने विजयी करण्याचा व निकालानंतर दिवाळी साजरी करण्याचा निश्चय केला आहे .
एकीकडे मराठा नेते जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठा मते विभागले जातील अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे कारण महाविकास आघाडीच्या एकाही खासदारांनी मराठा आरक्षण संदर्भात चुप्पी साधल्याने मराठा समाज द्विधा मनस्थितीत आहे येणारा काळ ठरवेल तुळजापूर शहरात विनोद पिटु गंगणे फॅक्टर चालणार