धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा

धाराशिव:- (प्रतिनिधी):- शिराढेाण पोलीस ठाणे: आरोपी नामे-माया बाळासाहेब पवार, वय 45 वर्षे, रा. शिराढोण तांडा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.21.07.2024 रोजी 11.30 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,600 ₹ किंमतीचे 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये शिराढेाण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-अलिम लायक पटेल, वय 33 वर्षे, रा. एकुरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.07.2024 रोजी 12.30 वा. सु. एकुरगा येथे व्हंताळ जाणारे रोडवर पत्रयाचे शेडमध्ये अंदाजे 1,050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
ढोकी पोलीस ठाणे: आरोपी नामे-प्रविण हनुमंत लाकाळ, रा. आरणी ता. धाराशिव हे दि.21.07.2024 रोजी 18.20 वा. सु. तेरणा धाब्याचे बाजूला मोकळ्या पटांगणात अंदाजे 5,600 ₹ किंमतीची 100 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-रघुराज दिपक पवार, वय 21 वर्षे, रा. तांबरी विभाग धाराशिव ता.जि. धाराशिव हे दि.21.07.2024 रोजी 18.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे: आरोपी नामे-दशरथ धनवंत पायाळ, वय 47 वर्षे, रा. सापनाई ता. कळंब ता. धाराशिव हे दि.21.07.2024 रोजी 20.00 वा. सु. भिम कॉर्नर पान टपरीमध्ये सापनाई येथे अंदाजे 900 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.