बी -बियाणे चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारास कृषीमंत्री महोदय यांनी जिल्हा प्रशासनास आदेश देऊन शेतकऱ्यांची लुट थांबवा – प्रा. दत्ता भाई प्रभाळे

गंगावाडी | वार्ताहर :- बीड जिल्ह्यात 7 जुन अगोदरच दुष्काळाच्या फटक्याने उध्वस्त झालेला शेतकरी खरीप हंगामाची पेरणीची तयारी करीत असताना कापुस, सोयाबीन या पिकाला प्राधान्य देत आहे परंतु महाबीज बियाणांचे व्यापाऱ्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. तुलसी कंपनीची कब्बडी, ऍग्रो सिड्स कंपनीचे 7067 बियांणाची विक्री 864 रुपये किंमतीची बॅग ब्लकने 1250 ते 1350 पेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्याची लूट सुरू केली जात आहे. सोयाबीन 2200 रु किंमतीची बॅग 3000 रु पर्यंत काळ्या बाजारात विक्री होत असताना. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांनी विशेष लक्ष वेधून जिल्हा प्रशासनास सुचना देऊन कृषी दुकानदारांचे स्टिंग ऑपरेशन करून ही लूट थांबवावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे नेते प्रा. दत्ताभाई प्रभाळे यांनी केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, महागाई त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आस्मानी व सुलतानी या दोन्ही संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील खरीप हंगामात बियाणे पेरले ते उगवलेच नाही, शासनाकडे तक्रार केली तर नुसते पंचनामे करून मोकळे होतात मात्र सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक मदत मिळून देण्याकरिता दुर्लक्ष करते, या वर्षी वेळेवर पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाली परंतु कापुस बॅग, सोयाबीन बी- बियांणाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे, तात्काळ शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी शेतकरीवर्ग करत असताना जिल्हा प्रशासनास झोपेचे सोंग घेवून कृषी दुकानदारांची पाठराखण करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदीच्या पावत्या व गोण्या जपून ठेवाव्यात, याही वर्षी उगवण झाली नाहीतर सीड कंपन्याला जाब विचारावा लागेल, संघटित होऊन शेतकऱ्यांनी स्वतः ही लुट होऊ देऊ नये असे युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रा. दत्ताभाई प्रभाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.