एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी खासदार धैर्यशिल मानेचे देविला साकडे….

तुळजापूर :- (प्रतिनिधी):- शिवसेनेचे हातकणंगनेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांनी तुळजापूर येथे रविवारी सहकुटुंब श्री तुळजा भवानी मातेची यथासांग पुजाअर्चा करून दर्शन घेतले.राज्यात चांगला पाऊस पाणी होवून शेतकरी सुखी व्हावा. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीची सत्ता येवून पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब होवून राज्याची सर्वजातींच्या लोकांची सेवा घडण्याकरीता श्री तुळजा भवानी मातेला घातले साकडे.यावेळी धाराशिव जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी खासदार धैर्यशिल माने यांचे पौरोहित्य करून शाल श्रीफळ तसेच देविची प्रतिमा देवून सत्कार केला.याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप,जेष्ठ शिवसैनिक पप्पू आबा मुंडे,युवा सेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,युवासेना तुळजापूर विधानसभा प्रमुख खंडु कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.