तुळजापूर शहरातील खडकाळ गल्ली येथे महीलांसाठी सुलभ शौचालय कामाचे उद्घाटन

तुळजापूर:- (प्रतिनिधी):- संजय गायकवाड:- तुळजापूर शहराच्या विकास आराखड्याच्या दृष्टी कोणातुन एक पाऊल पुढे होत आहे. तसेच युवा नेते विनोद पिटु गंगणे यांनी स्वताची जागा महिलांच्या सोयीच्या दृष्टी कोणातुन सुलभ शौचालयास* देण्याचा माणस केला आहे. त्याचे उदघाटन प्राथमीक स्वरुपा मध्ये होण्याच्या दृष्टी कोणातुन तेथील नव्याने बांधलेल्या दुकान जागेचे रुपांतर महीलांच्या सुलभ शौचालया मध्ये होणार आहे.त्याचे प्राथमीक स्वरुपा मध्ये उदघाटण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच उपस्थित युवा नेते विनोद गंगणे,मा नगराध्यक्ष सचिन रोचकरी,किशोर गंगणे,आनंद कंदले,नरेश अमृतराव,निलेश रोचकरी,अविनाश गंगणे,नानासाहेब लोंढे,शांताराम पेंदे,लखन पेंदे,विनोद पलंगे,नानासाहेब लोंढे,रत्नदिप भोसले,माऊली भोसले,रोहीत चव्हाण,समर्थ पैलवान,सुहास साळुंके शहरातील पुजारी बांधव उपस्थित होते.या निर्णयाचे तुळजापूर शहरातुन स्वागत होत आहे.