धाराशिवमध्ये मशाल पेटली; पुन्हा ओमराजे निंबाळकरांचा दणका…

धाराशिव:- (प्रतिनिधी):- |पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नूषा व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ओमराजे यांनी तब्बल तीन लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला आहे.|
|मोदी यांच्या लाटेमुळे आपण निवडून आलो असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता. तो या निवडणुकीत खोटा ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यामुळे मागील निवडणुकीतही आपण विजयी झालो होतो. सातत्यपूर्ण काम आणि सर्वसाधारण मतदारांसोबत असलेला संपर्क याच्या बळावरच मतदान करण्याचे आवाहन आपण केले होते. काम केले असेल तर मागील वेळेपेक्षा किमान एक मत यावेळी जास्त द्या, असे आवाहन केले आणि मतदारांनी दिलेला कौल आपल्या कामाची पावती असल्याची आणि भविष्यातील जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडण्यासाठी दिलेला आशीर्वाद असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.|
प्रतिक मयेकर
धाराशिव| लोकसभा निवडणुकांमध्ये देशात इंडिया आघाडीला व राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीने जवळपास ३० जागांवर विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यामध्ये, भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे.लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची मशाल पेटली असून ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले असून त्यांनी महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अर्चनाताई पाटील यांचा पराभव केला आहे. ओमराजे निंबाळकर हे सुरुवातीपासून आघाडीवर होते, त्यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत धाराशिव आपलाच असल्याचा संदेश दिला.
उस्मानाबादचे धाराशिव नामांतर झाल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची ठरली. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरची देखील पहिलीच निवडणूक असल्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार असल्याची चर्चा होती.धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. तर, महायुतीच्या उमेदवार बनून अर्चना पाटील मैदानात उतरल्या. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी येथील मतदारसंघात उत्साही मतदान झालं. ६ विधानसभा मतदारसंघ असलेल्या धाराशिव लोकसभेसाठी ६३.८८ टक्के मतदान झाले. गत २०१९ च्या तुलनेत ही टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं. वाढलेल्या टक्केवारीचा थेट फायदा ओमराजे यांनाच झाल्याचे दिसून आले.
धाराशिवमध्ये मशाल पेटली असून ओमराजे निंबाळकर हे ३ लाख २९ हजार ८४६ मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा तब्बल तीन लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला आहे>धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली.अर्चना पाटील या तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धाराशिवमध्ये सध्या काँग्रेसची परिस्थिती विकट झाली होती. १९९६ ला काँग्रेसचा गड बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने काबीज केला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी धाराशिव लोकसभेवर आळीपाळीने सत्ता मिळवली. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष गेल्या २५ वर्ष लोकसभेत आपली सत्ता आणू शकलेले नाहीत.
ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी उध्दव ठाकरे यांनी मतदारसंघात तब्बल सहा जाहीर सभा घेतल्या. तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. कागदावर बलाढ्य असलेल्या महायुतीचा विजय सहज होईल, असे आडाखे अनेकांकडून बांधले जात होते. त्या सर्व आडाख्यांना बाजूला सारत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यापाठोपाठ बार्शी, तुळजापूर, औसा, उमरगा आणि लोहारा विधानसभा मतदारसंघातूनही ओमराजे यांना मतदारांनी भरभरून कौल दिला आहे. उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघातून ५० हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य राजेनिंबाळकर यांच्या पारड्यात पडले आहे.