श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या निवासामध्ये अधिकारी ठेकेदार यांच्या संगणमताने महाराष्ट्रातील व इतर राज्यातील गोरगरीब भाविकांची मोठया प्रमाणात आर्थिक लूट याकडे कोण लक्ष देणार ?

तुळजापूर, दि २४ (प्रतिनिधी)-ज्ञानेश्वर गवळी :- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे १०८ व २४ भक्त निवास मध्ये अधिकारी व ठेकेदाराच्या संगणमताने हवे तो दरवाढ़ केलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातून अनेक राज्यातून भाविक भक्त येत असतात तसेच गोरगरीब भाविकांना कुठल्याही आर्थिक सवलत मिळत नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी श्री तुळजाभवानीमंदिर संस्थांचे १०८ व २४ भक्त निवास बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून श्री तुळजाभवानी विकास प्राधिकरण बजेट मंदिर संस्थान कड़े वर्ग करण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये व महाराष्ट्र शासनाला दिलेला प्रस्तावामध्ये सामान्य नागरिकांसाठी अल्प दरात काही रुम देण्याचे लिखित आहे श्री तुळजाभवानी शहाजीराजे महाद्वारासमोर रोज संध्याकाळी रस्त्यावरती गोरगरीब भावीक भक्त अस्तव्यस्त झोपलेले दिसतात याना कुठल्याही अल्प दरात रुम दिली जात नाही महाराष्ट्रशासनाने ठेकेदार व संबंधित अधिकारी याना कुरण आहे का काय ? पैसा महाराष्ट्र शासनाचा अधिकार ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्याचे कितपत योग्य आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे १०८ व २४ भक्त निवास मध्ये २५% तरी गोरगरीब भाविकांना सवलत देण्यात यावी अशी आम महाराष्ट्र राज्यातील व इतर राज्यातील भाविक भक्ताकडून मागणी मोठया प्रमाणात होत आहे.