दुष्काळग्रस्तांना जयेंद्र दुबळा मीत्र परिवाराकडून एक हात मदतीचा…

नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा – जयेंद्र दुबळा….
सुशांत संखे
डहाणू | निवडणूकीचा वादळ शमले असताना नैसर्गिक वादळाने पालघर झोडपले आहे. डोक्यावरचे छप्पर तर उपजीविकेचे साधन असलेल्या शेतीचे पार वाटोळे या वादळी पावसामुळे झालेले असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील कानाकोपऱ्यातील डझनभर नेते मत मांगायला आले परंतु वादळात नुकसान झालेल्यांना मदत करणे हे देखील आराध्य कर्तव्य म्हणून जाण नाही. नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे वाणगांव परिसरात काही ठिकाणी घराचे छप्पर उडून प्रचंड नुकसान तर फळ बागेतील हातात आलेला पीक पावसात वाहून गेल्यामुळे शेतकरी अत्यंत चिंतेत सापडलेला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे पालघर जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र किसन दुबळा यांनी तेथील नागरिकांची भेट घेत आर्थिक कोंडीत सापडलेल्या परिवारांना आर्थिक मदत केली आहे.
लोकसभा निवडणूकीमुळे आचारसंहिता लागू असून आचारसंहितेच्या अटी शिथिल करून नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई द्यावी असे देखील जयेंद्र दुबळा यांनी सांगितले आहे. तर निवडणुकीत मोठ मोठे आश्वासन देणारे आमदार सुट्टीची मजा घेण्यासाठी परगावी फिरत असताना आपल्या मतदारसंघात नेमकं घडतंय काय याची थोडीतरी जाणीव ठेवा असा टोला जयेंद्र दुबळा यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.