आपल धाराशिवताज्या बातम्या
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा उद्या तुळजापूर येथील जनता दरबार

तुळजापूर:- (प्रतिनिधी) :- रुपेश डोलारे धाराशिव :- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय, नवीन बसस्थानक शेजारी, तुळजापूर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, प्रलंबित विकास कामे, महावितरणच्या अडचणी, मनरेगाची कामे, दुष्काळी अनुदान यासह इतर अडचणींची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी आपल्या काही अडचणी असल्यास उद्या भाजपा संपर्क कार्यालय, तुळजापूर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे