मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसवे करता उर्से गावांतून बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन…

|सदर ठिकाणी मोठा घातपात होण्याची शक्यता असून गौण खनिज माफिया प्रितम आंबेकर हा फसवा दलाल शासकीय अधिकाऱ्यांना लिफाफा देऊन हाताशी धरून अनेक गरजू लोकांना फूस लावून आपली पोळी भाजत आहे.|
पालघर:- (प्रतिनिधी):- संतोष घरत डहाणू| पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू असून परवानगीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन यंत्रणा लावून काढले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. यामुळे परिसरातील गावांतील ग्रामस्थही भयभीत झाले आहेत.
एखाद्याा प्रकल्पातील बांधकामासाठी मुरुम,खडक, माती, वाळू आदी गौण खनिजांचा वापर होतो. केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-वडोदरा या राष्ट्रीय महामार्गासह अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू असून विविध विभागाकडून परवानगी आवश्यक असते. परंतु काही ठिकाणी ही परवानगी न घेता खनिजासाठी उत्खनन सुरू आहे. परवानगी जरी असली तरी मर्यादेपेक्षा जास्तीच्या प्रमाणात खनिजे काढली जात आहेत. तर काही ठिकाणे बदलून जुन्या परवानगीवर उत्खनन सुरू आहे. पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या डहाणू तालुक्यातील उर्से ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत सर्वे नंबर २२५ मध्ये ७/१२ धारकांची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसून तसेच महसूल विभागाची चुकीच्या पद्धतीने परवानगी घेऊन मोंटोकार्लो ह्या कंपनीने दिलेल्या पेटी ठेकेदारांकडून अनधिकृत प्रमाणात उत्खनन सुरू केले असून मोठ्या प्रमाणात दिवस रात्र यंत्राच्यासाह्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोदकाम केले आहे . असे काही ७/१२ धारक मालकांचे म्हणणे आहे.
डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उर्से येथील सर्वे नंबर. २२५ क्षेत्र २.४३००हे . आर चौ.मी. आणि पोट खराबा क्षेत्र ०.०००० हे. आर. चा खाता क्रमांक २३४ ही जमीन ७/१२ धारकाने अभय डोंगरे नामक व्यक्तीला दुय्यम निबंधक डहाणू यांच्याकडील दस्त क्रमांक ११८२ वर्ष २०१८ दिनांक. २४/०९/२०१८ विकली होती. झालेल्या व्यवहारांची ठरलेली रक्कम आज पर्यंत काही ७/१२ धारकांना मिळालेली नाही म्हणून सदर ७/१२ धारकांनी फेरफार करिता दिनांक ७/११/२०२२ रोजी मंडळ अधिकारी व तलाठी सजा उर्से येथे फेरफार करू नये म्हणून आक्षेप घेतलेला आहे
परंतु काही स्थानिक भूमाफियांनी काही ७/१२ धारकांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवस रात्र खोदकाम सुरू केले आहे. ते सदर कामाविषयी बोलायला गेले असता काही स्थानिक गाव गुंडाणे जीवे मारण्याची धमकी दिली असता त्याने थेट वाणगाव पोलीस स्टेशन गाठले. वानगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सातपुते यांनी सदरचे प्रकरण हे सिव्हिल विषय असल्याचे सांगत आपण ह्या बाबतीत तहसीलदारांशी संपर्क साधून सदर सुरू असलेल्या कामावर स्टे घ्यावा असे सांगितले. जमिन मालक तथा तक्रारदार यांच्या जीवितास धोका असल्याचे सांगून देखील पोलीस अधिकाऱ्याने साधी अदखलपात्र नोंद घेतली नाही म्हणजे किती गंभीर बाब आहे. पुढे ह्या ७/१२ धारकांना काही इजा झाल्यास जबाबदार कोण?
रात्रंदिवस सुरू असलेल्या उत्खननामुळे येथील नागरिकांची झोप उडालेली असून या उत्खननामुळे संपूर्ण गावाला हादरा बसत आहे. तसेच त्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य ही पसरलेले आहे .त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उत्खनन करतेवेळी केल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे जिवाला मोठा धोका पोहोचण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
|आम्ही जरी जमीन अभय डोंगरे ला विकली असली तरी आमचा व्यवहार पूर्ण झाला नसल्याने त्याने आम्हाला विश्वासात न घेता जबरदस्तीने त्या जमिनीवर उत्खनन सुरू केले आहे. ७/१२ आमच्या नावावर असताना आमची कुठल्याही प्रकारची रॉयल्टी करिता परवानगी घेतलेली नाही. मग रॉयल्टी कशी काय निघाली व कोणत्या अनुषंगाने उत्खनन सुरू केले.
तक्रारदार / ७/१२ धारक:-हर्षद पाटील|
|अभय डोंगरे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.|
|आम्हाला अभय डोंगरे ने ५०० ब्रास ची रॉयल्टी काढून दिली. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जेसीबी पोकलेन व ट्रक लावून उत्खनन केले आहे. मी कोणालाही दमदाटी किंवा शिवीगाळ केलेली नाही.