आम्मा पाणपोई मधील पाणी पेऊन नागरीकानी समाधान व्यक्त केले

नळदुर्ग :- (प्रतिनिधी):- दादासाहेब बनसोडे :- नळदुर्ग आणि परिसरातील ६० ते ७० खेडेगावातील नागरिक नळदुर्गच्या ऐतिहासिक शहरात दळणवळणासाठी येत आसतात ऐन उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने पारा ही शिगेला पोहोचला आहे या सर्व गोष्टीचा लेखाजोखा घेता आम्मा पाणपोई चे दाते नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक विनायक अंहकारी यांनी तहानलेल्या नागरिकांना जारमधील थंडगार पिण्यासाठी पाणी ठेवल्यामुळे हजारो नागरिकांनी या पाणपोईचा लाभ घेतला आम्मा पाणपोई मधील पाणी पेऊन नागरीकानी समाधान ही व्यक्त केले .आम्मा पाणपोई मुळे नळदुर्ग मध्ये हजारो लोकांची तहान भागवली नळदुर्ग येथील माजी नगरसेवक व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी आपल्या मातोश्री यमुनाबाई ( आम्मा ) रंगराव अहंकारी यांच्या स्मरणार्थ गेल्या दोन महिन्यापासून दररोज पाणपोई सुरु केली होती
निलम कलेक्शन समोर सुरु केलेली ही पाणपोई नळदुर्ग आणि परिसरातील लोकांना खूप फायद्याची ठरलीआजपर्यंत एकही दिवस खंड न पडता ही पाणपोई सुरु आहे..
आज या पाणपोईला आम्माच्या तिन्ही मुलांना भेट दिली..
यावेळी श्रीनिवास अहंकारी.. श्रीमती विजया बंडोपंत कुलकर्णी.. अमित देशपांडे व माजी नगरसेवक विनायक अहंकारी उपस्थित होते..
या पाणपोईची देखभाल हालीम पटेल.. राजशेखर भोसगे.. पंचशील कांबळे.. गुलाब येडगे.. प्रदीप ग्रामोपाध्याय यांनी केली आहे…