आपल धाराशिवताज्या बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगणगाव, आसु, पिंपळवाडी, वाकडी या ठिकाणी प्रचार सभा आणि कॉर्नर बैठका संपन्न

धाराशिव :-(प्रतिनिधी):- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगणगाव, आसु, पिंपळवाडी, वाकडी या ठिकाणी प्रचार सभा आणि कॉर्नर बैठका संपन्न झाल्या..
महायुतीला साथ देण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन यानिमित्ताने केले..
यावेळी .दत्ता अण्णा साळुंके, .गौतम लटके सर, .नवनाथ जगताप यांनीही मार्गदर्शन करून पालकमंत्री ना.तानाजी सावंत साहेब आणि आमदार .राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी .राजकुमार पाटील, जाधव, .गणेश खरसडे, .अमर काळे, .बिभीषण खुणे, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.