मोटार सायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.” धाराशिव जिल्हयातील ०६ मोटार सायकल गुन्हे उघडकीस …..

मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरून दिनांक 0३. 04. 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणणेकामी रवाना होवून कळंब येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब हद्दीत एक इसम चोरीच्या मोटार सायकल विकत आहे प्राप्त माहितीवरुन तात्काळ नमुद इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे चोरीच्या मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यास विश्वासात घेवून विचारणा केली असता त्याने व त्याच्या अन्य एक साथ्ीदाराने चोरुन आणलेल्या मोटार सायकल कळंब एम आय डीसी परीसरात निर्जन् ठिकाणी लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले तात्काळ नमुद ठिकाणी जावून शोध घेतला असता एकूण ०६ मोटार सायकल मिळून आल्या. धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता नमुद मोटार सायकल या पोस्टे कळंब, तुळजापूर, परांडा व शिरोठोण हददीतून चोरीस गेल्या असल्याचे दिसून आले नमुद इसमास तसेच ०२,४०,००० रु किमतीच्या एकूण ०६ मोटार सायकल ताब्यात घेवून त्यांना पुढील कारवाईस्तव पोस्टे तुळजापूर येथे हजर करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव फारुख तांबोळी, वय ४२ वर्षे रा कळंब, जि धाराशिव असे असून त्याचेकडून एकूण ०६ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलीस त्याचे अन्य साथीदाराचा शोध घेत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, ,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी,फरहान पठाण, चापोका डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.