सोलापुर जिल्ह्याचे विख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. वळसंगकर कशामुळे होते तणावात ? आत्महत्येचं धक्कादायक कारण

सोलापूर:- (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं यावरुन अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.
तसेच दरम्यान रुग्णालयाच्या व्यवहारातून बेदखल केल्यामुळे बेदखल केल्यामुळे ते निराश झाले होते. आणि यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहेत. शनिवारी दुपारी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
एका मराठी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री अपेक्षित असताना रुग्णालयांकडून नोंद न करता पैसे आकारले जात होते. यावर वळसंगकर यांनी आक्षेप नोंदवला होता. याशिवाय जी महिला कर्मचारी अशा प्रकारे रुग्णांकडून पैसे घेत होती, तिलाही वळसंगकर यांनी कामावरुन काढून टाकलं होतं, अशीही माहिती सांगितली जात आहे. या महिला कर्मचाऱ्याला कामावरुन काढून काढल्यामुळे तिने आत्महत्येची धमकी डॉक्टरांना दिली होती. या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे.
वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना डॉ. शिरीष वळसंगकरांनी अनेक गरीब रुग्णांची बिलं माफ केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना रुग्णालयाच्या व्यवहारातून दूर केल्यानं त्यांना प्रत्यक्षात गरीब रुग्णांना फारशी मदत करता येत नव्हती.