आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विशेष प्रयत्नातुन नगर परिषद तुळजापूरला १ कोटी अग्निशामन वहाणाची व्यवस्था

तुळजापूर:- (प्रतिनिधी):- अग्निशामक सेवा बळकटीकरणच्या माध्यमातुन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विशेष प्रयत्नातुन नगर परिषद तुळजापूर शहराला १ कोटी अग्निशामन वहाणाची पूर्तता करून दिली.तसेच आई श्री तुळजा भवानी साडे तीन शक्तीपीठ असलेले तुळजापूर शहरा मध्ये दररोज लाखो भाविक आई श्री तुळजाभवनीच्या दर्शनासाठी येत असतात. शहराची वाढती लोकसंख्या पाहता तसेच शहराच्या बाह्य ठिकाणी हद्द वाढ भागा मध्ये सद्य परस्थितीला मोठ्या प्रमाणा मध्ये नव्याने बांधकाम कामे होत. आहेत तसेच शहरातही नव्याने उंच अशा इमारतीचे बांधकाम होत आहेत.पूर्वी एक अग्निशामन वाहन होते ते सद्य परस्थितीला जुने झाल्या मुळे त्याची आपत्कालीन वेळेस सेवा सुरळीत होत नसे या कारणास्तव अध्यावत अशी नविन अग्नीशामन वाहनाची व्यवस्था आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासन दरबारी प्रयत्न करुन नगर परिषदच्या माध्यमातुन शहरास नविन अग्नीशामन गाडी उपलब्ध करुन दिली.तसेच नविन अग्निशामन वाहन हे अंदाजीत ६० फुट उंची पर्यंत पाण्याचा फवारा मारु शकते तसेच अत्याश्यक सेवा म्हणुन अग्निशामन वाहना मुळे शहर तथा तालुक्यातील सूविधा उपलब्ध होणार आहे.या नविन अग्नीशामन वहाण उपलब्ध करुन दिल्या बद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचे तुळजापूर शहवासियां कडुन आभार व्यक्त होत आहेत. तसेच अग्निशामन वाहणाचे आज शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या मुहुर्तावरती मंदीर महाद्वार येथे पुजन करण्यात आले.पुजन हे महंत वाकोजी महाराज,नगरसेवक अमर दाजी हंगरगेकर,किशोर साठे,अविनाश गंगणे,औदुंबर कदम,नरेश अमृतराव,शहरध्यक्ष शांताराम पेंन्दे,शुभम क्षिरसागर,नगर परिषद कार्यालयीन अधिक्षक पाठक साहेब,अग्निशामन कर्मचारी देवकतेआदींच्या हस्ते पुजन करण्यात आले.