आपल धाराशिवमहाराष्ट्र

राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्ड?; धक्कादायक बातमी समोर

मुंबई:- (प्रतिनिधी):- जगभरात सध्या HMPV विषाणूने धास्ती वाढवली आहे. चीनमध्ये हा विषाणू तेजीने फैलावत चालला आहे. भारतात देखील याचे रुग्ण आढळून आले आहेत. इतकंच नाही तर, महाराष्ट्रातील नागपुरात देखील या विषाणूचे 2 रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. या पाठोपाठ नागपूरमध्ये एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळले.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती-
या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना महत्वाची प्रतिक्रिया दिली. हा विषाणू आधीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, चीनमध्ये तो झपाट्याने वाढत चालला आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं प्रकाश आबिटकर म्हणाले. (HMPV Virus)यावेळी मीडिया प्रतिनिधींनी त्यांना कोरोनाकाळात जसं रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं तशीच तयारी आताही करण्यात आलीये का?, असा सवाल केला. त्यावर प्रकाश आबिटकर म्हणाले की, केंद्र शासनाने कालच निर्देश जारी केले आहेत. राज्यातील आरोग्य विभाग त्याच पद्धतीने कामकाज करत आहे. सध्या विलगीकरण्याची आवश्यकता नाही. मात्र, नागरिकांनी सर्व सूचनांचे पालन करावे.या सूचना आज किंवा उद्या जाहीर होतील.नागपुरात 2 रुग्ण आढळले
दरम्यान, या विषाणूचा महाराष्ट्र देखील शिरकाव होताना दिसून येत आहे. नागपुरात दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला या विषाणूची लागण झाली असल्याचं बोललं जातंय. यामुळे नागरिकांची देखील धाकधूक वाढली आहे. दोन्ही लहान मुलांना 3 जानेवारीरोजी HMPV ची लागण झाल्याचं निदान झालं होतं.दोघांचाही HMPV चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसून आली. मात्र, सध्या त्यांची प्रकृती एकदम ठीक असून ते आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे. दोघांमध्येही सामान्य लक्षणं दिसत होती. कोणतीही गंभीर लक्षणं नसल्यामुळे त्यांना औषधोपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. (HMPV Virus)अशी घ्या काळजी-
-खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल ठेवा
साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरने आपले स्वच्छ ठेवा
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे उपचार घ्या आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा (HMPV Virus)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button