तगर भुमी बुध्द विहार येथे दिनांक १९ जानेवारी रोजी बौद्ध धम्म परिषदेचे प्रसिद्धी पत्रकाचे उद्घाटन.

धाराशिव :-(प्रतिनिधी):- दि.१९ जानेवारी रोजी घाटंग्री परिसरातील तगर भुमी बुद्ध विहारात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले असुन या परिषदेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर हे उपस्थित राहणार असून बौध्द गया येथील बोधी वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे.या बौद्ध धम्म परिषदेच्या प्रसिद्धी पत्रकाचे उद्घाटन आज रोजी राजगीर वधु वर कार्यालयांमध्ये पुज्यनीय भंते सुमेधजी नागसेन यांच्या हस्ते संपन्न झाले.या बौद्ध धम्म परिषदेस बौद्ध उपासक व उपासिका भीम अनुयायी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व बौद्ध धम्मातील धम्म देसणा घ्यावी असे आवाहन पुज्यनीय भन्ते सुमेधजी नागसेन यांनी केले आहे याप्रसंगी बापु सोनटक्के,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे,बापु कुचेकर,गणेश वाघमारे,नागनाथ गोरसे,संपतराव शिंदे,बलभीम कांबळे,राजेंद्र धावारे,सिद्राम वाघमारे,गौरव धावारे,रमेश कांबळे,बाबासाहेब बनसोडे, नवनाथ वाघमारे,विजय सपकाळ, ज्ञानेश्वर वडवेराव व इतर अन्य उपस्थित होते