आपल धाराशिवताज्या बातम्या

तामलवाडी येथील नियोजित एम.आय.डी.सी च्या जागेची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली पहाणी. मात्र शेतकरी आपल्या भुमिकेवर ठाम

तुळजापूर (प्रतिनिधी):- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एम.आय.डी.सी च्या जागेची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी यांच्या सोबत पहाणी केली. व शेतकर्यांशी संवाद साधला यावेळी, शेतकर्यांनी आपल्या वाहीक जमीनी देणार नाही या भुमिकेवर ठाम असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एम.आय.डी.सी च्या जागेची तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत दि. 04 रोजी पहाणी केली. व शेतकर्यांना विश्वासात घेऊनच पुढील प्रक्रिया पार पडणार असुन शेतकर्यांना जमीनीचा योग्य मोबदला देऊनच भुसंपादन करण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले तसेच मी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगत आपण शेतकर्यांच्या बाजुने असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

तामलवाडी येथील 367 एकर जागेवर एम.आय.डि.सी होणार असुन एम.आय.डी.सी झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असुन स्थानिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. यावर तामलवाडी येथील नियोजित सदरील एम.आय.डी.सी.च्या जागेसाठी वाहीक असलेल्या जमीनी देणार नसल्याचे शेतकर्यांनी आजही स्पष्ट केले आहे. कटारे उद्योगसमूह व काही शेतकऱ्यांची जेवढी पडीक जमीन आहे त्या जमीनीवर एम.आय.डी.सी.चा प्रकल्प करा त्या प्रकल्पाला आमचा विरोध नसल्याचे शेतकर्यांनी बोलताना सांगितले व आपल्या वाहीक बागायती जमीनी देणार नसल्याचे सांगितले.

वाहीक व बागायती क्षेत्र कमी करून पडीक, नापिक -शेतकरी सचिन शिंदे

तामलवाडी येथील नियोजित एम.आय.डी.सी.च्या जागेसाठी पडीक, नापिक जमीनी घ्या परंतु शेतकऱ्यांच्या वाहीक व बागायती जमीनी घेऊ नका त्या प्रकल्पामधुन सदरील जमीनी कमी करा असे शेतकरी सचिन शिंदे यांनी सांगितले. यावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी बालाजी निलेवार यांना शेतकर्यांचे म्हणणे लिहुन घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या वाहीक व बागायती जमीनी एम.आय.डी.सी.च्या या प्रकल्पातुन वगळणार का? हे पहावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button