आपल धाराशिवताज्या बातम्या

भगतवाडी येथील जगदंबा देवी यात्रा संपन्न….

उमरगा / प्रतिनिधी – तालुक्यातील भगतवाडी येथील श्री भगवती (जगदंबा ) देवी मंदिराची यात्रा सोमवारी (दि 29) पासून मोठया उत्साहात यात्रेला सुरुवात झाली. श्री भगवती देवीच्या दर्शनासाठी पायथ्यापासून डोंगरमाथ्यापर्यंत भक्त भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी (दि 31) यात्रेची मोठया भक्तीमय वातावरणात सांगता झाली.
धाराशिव , लातूर, सोलापूर जिल्ह्या शेजारील कर्नाटक राज्यातील आळंद, बसवकल्याण तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवतीदेवीचा यात्रा महोत्सव दरवर्षी संपन्न होतो. तुळजापूरच्या तुळजाभवानीची धाकटी
बहिण म्हणून श्री.भगवती देवस्थानचे महत्व आहे. मार्गशिर्ष महिन्यातील वेळ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी श्री देवी यात्रा महोत्सव सुरुवात होण्याची परंपरा आहे. श्री महोत्सवानिमित्त
सोमवारी (30) रात्री आराध्यांचा जागर अन मेळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मंदिराचे पुजारी सुधाकर मेकाले, भगवतीदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांच्यासह पुजा-यांच्या हस्ते भगवती देवीला विधिवत महाअभिषेक घालण्यात
आला. दिवसभर मोठ्या प्रमाणात डोंगर पायथ्याशी भव्ययात्रा भरली होती यात्रेत अनेक व्यावसायिकांची दुकाने थाटली होती, बालगोपाळांनी यात्रेत विविध खेळणी, झोपाळे, जम्पिंग, स्लॅम्बो, कॉन्सी, आदी खेळण्यासह दर्शनाचा आनंद लुटला. कोंबड्यासह पुरणपोळीच्या नैवेद्याचा
मान भगवती देवीच्या चरणी अर्पण करून भक्त भाविकांनी मनोकामना पूर्ण करण्याची आशा बाळगली. राज्य व परराज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या हजारो भाविकांनी भगवती देवीचे दर्शन घेतले. दिवसभर यात्रेत भक्त भाविकांची गर्दी मोठी असल्याने पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी छबीना मिरवणूक झाल्यानंतर यात्रेची सांगता मंगळवारी ता. (31) रोजी करण्यात आली.
यावेळी भगवतीदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष शेषेराव पवार, सचिव बी के पवार, गोविंदराव पवार, माणिक पवार, सरंपच चंद्रकांत स्वामी , उपसरपंच भीमराव पवार , बाळू स्वामी, करनुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बालाजी पवार, राजकुमार करनूरे, अरविंद जाधव, श्रीमंतराव पवार, अर्जुन पवार, सिद्धेश्वर माने, विठ्ठल पवार, अतुल जाधव, राजू इठूबोने, शैलेश नागणे, आण्णा पवार, सिद्धेश्वर पवार गोरख पवार, राम हलकुडे, बबन काजळे, राहुल पवार, प्रशांत पवार, परमेश्वर पवार यांच्यासह भगवती देवी मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button