भूम तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा

धाराशिव:-(प्रतिनिधी):- मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.23.05.2024 रोजी 13.15 वा. सु. अर्जुन रेख पवार यांचे घरासमोर नाईनगर मु. येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) अर्जुन रेखू पवार, 2) श्रीराम सिताराम चव्हाण, 3) दिनकर बन्शी पवार, 4)विजय धनराज राठोड रा. नाईकनगर मु. ता. उमरगा जि.धाराशिव हे 14.50 वा. सु. अर्जुन रेखू पवारयांचे घरासमोरनाईकनगर मु. येथे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,420 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.23.05.2024 रोजी 13.15 वा. सु. बस स्थानक भुमच्या गेटच्या बाजूस भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) आयाज अब्दुल पठाण, वय 21 रा. गराडगल्ली भुम ता. भुम जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. बस स्थानक भुमच्या गेटच्या बाजूस भुम येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 750 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. आरोपी नामे- 2) प्रताप राजेंद्र राउत, वय 36 रा. लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. फलोरा चौक भुमच्या बाजूस असलेल्या टपरीमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.